यवतमाळ सामाजिक

नवी क्रांती घडविणारं, ते आमदार कोण?

 

लोकनेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकत नवी क्रांती घडवून आनणारआमदार इंद्रनील नाईक

गोर शिकवाडी गोर सेना अमरावती विभागीय नायकी र सोगन कार्यक्रमाचे आयोजन ५ डिसेंबर २०२० रोजी श्रधस्थळ गहुली तालुका पुसद येथे करण्यात आले होते.
५ डिसेंबर बंजारा समाजातील गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ५ डिसेंबर १९६३ रोजी लोकनेते वसंतराव नाईक साहेबांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुसद मतदार संघाचे लाडके आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक व गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अमरावती विभागातील बहुसंख्य बंजारा समाज बांधव उपस्थित होते.
लोकनेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकत साहेबांनी हरित क्रांती, धवल क्रांती घडवून महाराष्ट्राला अन्न धान्य परिपूर्ण करत सर्व सामन्याच्या मनात साहेब आजवर आहेत. लोकनेते वसंतराव नाईक साहेब परत नाईक बंगल्यातून जन्माला यावा असे भावनात्मक उदगारक प्रा.संदेश चव्हाण यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय संयोजक प्रा.अनिल खोला, पुसद तालुका अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हा संयोजक देवानंद केळूत, प्रा. भारत वडत्या, प्रा.मनोज राठोड, जिल्हा अध्यक्ष किशोर पालत्या, जिल्हा उपाध्यक्ष मारोती कडावत, जिल्हा सचिव गोर प्रफुल्ल जाधव, व सर्व गोर शिकवाडी गोर सेना अमरावती विभागीय पदाधिकारी उपस्थित होते

लोकनेते वसंतराव नाईक साहेब यांनी केलेले काम आज देखील सुरळीत आणि विकसित होत आहे.बंजारा समाजाच्या कार्यासाठी मी कटीबद्ध आहे समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – इंद्रनील नाईक आमदार

साहेबांनी केलेले कार्य हे मला नेहमी प्रेरणादाई आहे. तांड्यांना महसुली दर्जा देणार तांड्याच्या विकासासाठी सभागृहात आवाज उठविणार – निलय नाईक आमदार

Copyright ©