यवतमाळ सामाजिक

आर्णी चे बार रेस्टॉरंट बनु शकतात कोरोणा चे स्प्रेडर

 

शासनाच्या आदेशाची होते पायमल्ली

आर्णी /जिल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने नियमावली तयार करून संपूर्ण व्यापाऱ्यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे आदेश मा.जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
मात्र आर्णी शहरातील बार आणि रेस्टॉरंटमध्ये या निलमावलीचे खुलेआम उलघन होत आहे.तरी सुद्धा आर्णी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सामान्य जजतेतून बोलल्या जात आहे.
शहरातील संपूर्ण व्यापार लाईन रात्री नऊ ला बंद होते.परंतु बार व रेस्टॉरंट रात्री बारा बारा वाजे पर्यंत सुरूच राहत असल्याने शहरात अनेक चर्चा रंगताना दिसत आहे.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे.आणि दुसरीकडे बार व रेस्टॉरंटमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत गर्दी पहावयास मिळत असल्याने यांना नेमकं एवढ्या वेळ बार सुरू ठेवण्याची परवानगी कोण देत असेल?
शहरातील एकाही बार आणि रेस्टॉरंटमध्ये कोरोना सारख्या महामारीपासून दूर राहण्यासाठी बार मध्ये येणाऱ्या कोणत्याच ग्राहकांना मास किव्हा सेनेटायजर दिल्या जात नसल्याने
कोरोनाचे नियम खुलेआम उडविल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.

तो नटाचा आदर्श ठेवणारा अधिकाऱ्यांच्या संपर्कात

सद्या तालुक्यात कोरोना संसर्ग कमी झाल्याने जनमानसात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र शहरातील तो नटाचा आदर्श ठेवणारा आपल्या बार मध्ये शासनाचे सर्वच नियम धाब्यावर ठेऊन अधिकारीच आपल्या खिश्यात असल्याचं सर्वसामान्य जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जनमानसात चर्चेचा विषय बनला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढला तर जवाबदार कोण?

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासना कडून वेळोवेळी जनजागृती केली जात आहे मात्र आर्णी शहरातील बार व रेस्टॉरंटमध्ये शासनाच्या आदेशाची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे शहरात जर कोरोना संसर्ग वाढला तर याला जबाबदार कोण राहील?असे अणेक प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

Copyright ©