Breaking News

८ डिसेंबर रोजी भारत बंद चा एल्गार

 

केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्ली सह देशभरात विविध ठिकाणी जोरदार विरोध प्रदर्शन सुरू आहे त्याच अनुशंगाने
सर्व शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की केंद्र शासनाने कृषी विषयक कायदे पारित केलेले आहे. त्या कायद्याच्या विरोधात दिनांक ०८/१२/२०२० रोजी मंगळवार ला विविध शेतकरी संघनेनी भारत बंद विरोधात एल्गार केलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पूणे यांनी भारत बंदला पाठींबा देण्याचे दृष्टीने सर्व बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविले आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, दिनांक ०८/१२/२०२० रोजी राळेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुख्य बाजार राळेगांव उपबाजार वाढोणा बाजार आणि खैरी या तिन्ही केंद्रा वरील सर्व व्यवहार बंद राहील.
तरी कृपया आपण कापूस आणि धान्य बाजार समिती येथे आणू नये ही नम्र विनंती.
दिनांक ०९/१२/२०२० पासुन कापूस आणि धान्याची खरेदी पूर्ववत सुरू राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व बाजार समितीला सहकार्य करावे ही विनंती.

राळेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव जि. यवतमाळ

Copyright ©