यवतमाळ सामाजिक

ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

 

ता’ प्र मारेगाव
भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ग्रामिण पत्रकार संघ मारेगाव च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिना निमित्त सकाळ पासुनच येथील आंबेडकर चौकातील असलेल्या आंबेडकर भवना जवळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते.
त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावचे तालुका अध्यक्ष प्रा.डॉ. माणिक ठिकरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा पोटे,अशोक कोरडे,नागेश रायपुरे,कैलास ठेंगणे,भाष्कर राऊत, गौतम दारुडे, संजय जीवने,वसुमित्र वनकर,अनंता खाडे, आदी समाज बांधव उपस्थि होते.

Copyright ©