यवतमाळ सामाजिक

बोरगाव येथे आदर्श महापरिनिर्वाहण दिन कसा केला साजरा?

 

आर्णी/ तालुक्यातील बोरगाव येथे आज सकाळी गावकर्यांनी एक आदर्श महापरिनिर्वाहण दिन कसा साजरा केला जातो याचे उत्तम उदाहरण समाजा समोर ठेवले.
रुग्ण सेवे पेक्षा मोठी सेवा कोणती असू शकत नाही या उदात्त हेतूने देशाचे माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहिर यांच्या मदतीने बोरगाव या गावातील गावकरी भाजप तालुका अध्यक्ष विपीन राठोड सर्वांच्या सहकार्याने आज बोरगाव वासियासाठी गरजू रुग्णां करीत मोफत अत्याधुनिक रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
कोरोना महामारीच्या या काळात रुग्णांना ने आन करण्या करीता रुग्ण वाहिका खुप महत्वाची कामगिरी करीत असताना रुग्ण वाहिकेवर प्रचंड ताण पडला आहे हा ताण थोडा का होईना कमी होण्या करीता या रुग्ण वाहिके ची मदत होईल असे मत गावकर्यांनी बोलून दाखवले.
विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाहण दिनी रुग्ण सेवेचा ध्यास अंगिकारून गरजू रुग्णाकरिता रुग्ण वाहिका सेवेत सादर करून खऱ्या अर्थाने डॉ भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करून एक आदर्श महापरिनिर्वाहण दिन साजरा केला.या वेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

Copyright ©