यवतमाळ सामाजिक

गटविकास अधिकाऱ्याची मुख्यालयाला दांडी पंचायत समिती मारेगाव मधील प्रकार

 

 

ता प्र – मारेगाव: अधिकाऱ्यांनी,कर्मचारी मुख्यालयाला राहण्याचा शासनाचे आदेश असताना मात्र येथील प्रभारी गटविकास अधिकारी हे आदेशाला झुंगारून मुख्यालयाला नेहमीच दांडी मारत असल्याने पंचायत समिती मध्ये काम घेऊन येणाऱ्या असंख्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप पंचायत समिती उपसभापती तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी यांनी केला आहे.

मारेगाव पंचायत समिती मध्ये जवपास अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी हे यवतमाळ, पांढरकवडा,वणी आदी ठिकाणावरून जाणे येणे करतात त्यामुळे अनेकांचा कार्यालयात येण्याचा वेळ ही कार्यालयीन वेळेत निश्चित नसते तर अनेक व्यक्ती उशिरा परत येऊन घर जवळ करतात.यामुळे तालुक्यातील विविध कामासाठी आलेल्या गोर गरीब नागरिकांना अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्तीत राहत नसल्याने येथील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार संजय आवारी यांनी केली आहे.

शासनाची कार्यालयीन वेळ ही 10 वाजताची असताना येथील अधिकाऱ्यां सह कर्मचारी हे वेळेवर कधीच उपस्तीत राहत नाही.तसेच अधिकाऱ्यांचे मुख्यालयाला राहणे बंधनकारक असताना,ते यवतमाळ वरूनच कार्यालयाचे सूत्र हलवतात.यामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना एका कामा साठी दहा वेळा चकरा माराव्या लागतात.त्यामुळे पंचायत समिती चे कामकाज वाऱ्यावर आले आहे

(बॉक्स)
कार्यरत क्लास 1 चे अधिकारी सोडून क्लास 2 च्या हातात गटविकास अधिकारी यांचा प्रभार

गेल्या सहा/सात महिन्या पूर्वी वर्ग 1 चे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी हे सेवा निवृत्त झाले.काही दिवस येथीलच कार्यरत असलेले वर्ग एक च्या एका अधिकाऱ्याच्या हातात गटविकास अधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आला.आणी अनुभवी असल्याने कार्यप्रभार सुद्धा सुरळीत चालू होता.मात्र त्यांचे कडील प्रभार काढण्यात आला.आणी यवतमाळ येथील जिल्हा परिषद कार्यालयात कार्यरत असलेल्या एका वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांकडे गटविकास अधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आल्याने येथील भोंगळ कारभाराला नागरिकास समोरी जावे लागत आहे.

प्रतिक्रिया
लॉकडाऊन काळात खरेदी केलेल्या फॉगिंग मशिन संदर्भात ७ ते ८ महिने झाले तरी वरिष्टांना अहवाल न पाठविणे ,हागणदरीमुक्त गाव संदर्भात वारंवार मिटिंग घेऊन सुद्धा उपाययोजनेचा अभाव , जसे गुड मार्निंग पथक नेमने, ग्रा प ऑफरेटरांना धमकावने, . त्यांचा पगार न काढने, त्यांचे कडून कामे करून घेणे, अधिकारी असल्याने ऑपरेटर बोलायची हिंमत न केल्याने गटविकास अधिकारी आपलीच मनमानी करत करतात .आपण या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करत असल्याची माहिती दिली
संजय आवारी उपसभापती पं स मारेगाव

प्रतिक्रिया
मी गैरहजर राहतो हे सत्य नाही,मी नेहमीच वेळेवर येत असतो आणि वेळेवर जात असतो. कोणत्याही नागरिकांचे काम प्रलंबित नाही माझावर केलेले आरोप खोटे आहे.
प्रभाकर पांडे
प्रभारी गटविकास अधिकारी मारेगाव

Copyright ©