महेश ठसाळ यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया हृदयाच्या ऑलच्या शस्त्रक्रियेसाठी एक लाखाचा निधी
भांडुप मुंबई : रत्नागिरी येथील दाभोळ गावातील रहिवाशी दत्ताराम ठसाळ यांच्या मुलाच्या वालच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल एक लाखाचा निधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे मिळाला. नवीमुंबई येथील तेरणा रूनालया मध्ये महेश ठसाळ यांच्या हृदयाच्या वॉलची शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत करण्यात आली. दरम्यान, महागडी शस्त्रक्रिया केवळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षमुळे झाली अशी प्रतिक्रिया महेशच्या वडिलांनी दिली आहे.
नवी मुंबई येथील तेरणा रुग्णालया मध्ये ही शस्त्रकिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल एक लाख खर्च अपेक्षित होता. दत्ताराम ठसाळ यांच्या साठी हा खर्च करणे अशक्य होते.
मात्र गवळी सेवा फाऊंडेशन या गवळी समाजाच्या हक्काच्या संस्थेकडे त्यांनी धाव घेतली. रत्नागिरी चे स्वयंसेवक परशुराम ठसाळ यांनी लगेच संस्थेचे संस्थापक दिनेश भोजने यांना याची कल्पना दिली. संस्थेच्या संस्थापकांनी ठाणे जिल्हा सल्लागार सुरेश ठसाळ यांच्याशी चर्चा केली व ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत ठसाळ यांनी युवासेनेचे लोकमान्य नगर विभाग अधिकारी कु. गणेश शेलार यांच्याशी संपर्क केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कु. गणेश शेलार यांनी दिली आणि त्यांची समस्या जाणून घेवून हा खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या निधीतून करण्यात आला. ठसाळ यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे, रविंद्र कदम, व युवासेना लोकमान्य नगर विभाग अधिकारी कु.गणेश शेलार आणि त्यांच्या टीमचे आभार मानले .
तसेच गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या गवळी समाज्याच्या हक्काच्या संस्थेच्या स्वयंसेवक यांचे मनापासून आभार वेक्त केले.
संस्थेने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले .
Add Comment