महाराष्ट्र सामाजिक

रुग्णांला मिळाला प्रहार चा देवदूत

 

मंगरूळ येथील अपघातातील
जखमी गजानन गोडे यांना प्रहार रुग्ण सेवकांनी दिली साथ दिनांक १८ नोव्हेंबर पासून गजानन गोडे हे कस्तुरबा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे उपचार घेत होते त्यांचा १८ नोव्हेंबर रोजी वणी मारेगांव मार्गावर ऑटो अपघात झाल्यामुळे गंभीर जखमी झाले होते तेव्हापासून सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असता आज दि. ४ डिसेंबर रोजी सुट्टी झाली होती परंतु १४५०० रुपये बिल निघाले असता गजानन कुटुंबातील करता असल्यामुळे हातावर आणने आणि पानावर खाणे एकीकडे कोरोना महामारीने थयमान घातला असून गजानन ला कायकरावे सुचेनासे झाले मजुरी हा एकमेव व्यवसाय असल्यामुळे पैशाची अडचण भासत होती गजानन ला विचार पडताच अचानक देवदूत प्रहार रुग्ण सेवक संजय गुरणुले यांचा विषयी माहिती मिळताच त्याने गजानन चा मोबाईल नंबर घेवून संपर्क केला असता त्यांनी स्वतः सेवाग्राम रुग्णालयात येवून श्री विकास भाऊ दांडगे प्रहार वर्धा जिल्हा प्रमुख यांचे सहकार्याने संपूर्ण बिल कमी करून सहकार्य केले गजानन गोडे व त्यांच्या पत्नी यांनी प्रहार चे आभार मानले

 

Copyright ©