यवतमाळ सामाजिक

रिद्धपुर येथे त्वरित मराठी विद्यापीठ करण्याची मागणी

रिध्यपुर येथे मराठी विद्यापीठ देण्याच्या मागणी करिता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
परब्रम्ह परमेश्वर “सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, यांचे मराठी विद्यापीठ” व्हावे या अनुशंगाने महानुभाव पंथ साधक अनुयायीं यांची चळवळ सुरू असुन या करिता
आपापल्या तालुक्यातील जिल्हापातळीवरील निवेदने देऊन मागणी करावी विशेष म्हणजे मराठी भाषेतला पहिला गद्यग्रंथ अर्थातच ग्रंथराज लीळा चरित्र हा महान ग्रंथ प पु पंडित म्हाइंभट यांनी रिद्धपुर, यागावी वाजेश्वरी, येथे लिहीला आहे.
आणि याच परिसरात भारतातील पहिले मराठी विद्यापीठ स्थापन व्हावे, हि समस्त महानुवांची मागणी आहे. याकरिता विविध संघटना व संस्था आक्रमक झाल्या आहे
त्याच माध्यमातुन रिद्धपुर येथे फडणवीस विद्यापीठ करण्याचे आश्वासन देऊन सरकारने सर्वे करिता एक समितीहि नेमली होती त्या समितीने सर्वे करून जागा पाहुन गेली आणि त्या घटनेला जवळ जवळ २ वर्षे हाेत आहे.
परंतु अद्यापही विद्यापीठाची कागदोपत्री घोषणा झाली नाही आणि विद्यापीठ चळवळ कुठे तरि थंड झाल्याचे दिसून येत आहे. हि चळवळ सतत चालु राहणार असुन त्या करिता या पुढेही हि चळवळ तीव्र करण्यात येणार आहे , या उद्देशाने अखिल भारतीय महानुभाव वासनिक परिषदेच्या माध्यमातून कळंब तालुक्यातील महानुभाव पंथ गवळी समाजाच्या वतीने निवेदन प्रस्ताव मा. तहसीलदार यांना देण्यांत आले. यावेळी ई. प्रेमराज बाबा जामोदेकर, भास्कररावजी साठे, कैलास गलाट, संदिप बोपटे, किशोर साठे, देविदासजी साठे, बाबारावजी साठे, छगन पाणे, प्रितम चावरे , अक्षय येवले, शाम काकडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©