यवतमाळ सामाजिक

आर्णी बाजार समिती मध्ये फ्री स्टाईल, कोणी कोणाला का मारले

 

आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जुन्या वादातून दोन गटात राडा झाल्याची घटना दिनांक 1 डिसेंबर ला दुपारी तिन च्या दरम्यान घडली.
मागिल शनिवारी आर्णी येथील व्यापारी अनिल बेलगमवार आणि जवळा येथील पिंटु चोपडे या दोन व्यापाऱ्या मध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता. शनिवारी मार्केट मध्ये पिंटू चोपडे यांचा धान्य काटा करण्याचा नंबर असताना बेलगमवार यांनी तू काटा करू नको असे बोलून वाद घातला त्यामुळे इतर सगळे व्यापारी बघत होते तेव्हा पिंटू चोपडे यांनी सर्वाना माझ्यावर अन्याय होत असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेता असे म्हटले तर पुडील व्यक्तीने त्यांना पत्नीवर शिवीगाळ केली अशी माहिती प्रत्यक्ष दर्शीनी दिली आहे
शनिवारी बेलगमवार यांनी पिंटु चोपडे ला मारहाण केली.
त्याचा वचपा मंगळवारी चोपडे यांनी काढल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे
मंगळवारी दुपार च्या दरम्यान जवळा येथील वीस ते पंचवीस लोकांचा जमावाने अचानक बाजार समिती मध्ये धडक दिली आणि आर्णी येथील अनिल बेलगमवार व त्यांचे भाऊ अमोल बेलगमवार यांना मारहान केली.
या मारहाणीत अनिल बेलगमवार गंभीर जखमी झाले आहे
बाजार समितीत घडलेल्या अचानक हाणामारीने काही वेळेसाठी बाजार समितीत चांगलाच गोंधळ उडाला होता. उशीरा पर्यंत तडजोड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने बातमी लिहे पर्यंत पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली नव्हती.

Copyright ©