Breaking News

ग्रामपंचायत झाली राम भरोशे, का? झाली

नेमलेल्या काही ग्रामपंचायतींचे कामकाज रामभरोसे सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी ग्रामसेवक नागरिकांना अजिबात जुमानत नसल्याचे चित्र असल्याने प्रशासकांचे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण राहिलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे.अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मोबाईल वरूनच गावांचा कारभार चालवताना दिसत आहे,त्यामुळे प्रशासक नेमण्याच्या शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे.सध्या नागरिकांना ग्रामपंचायत संबंधित विविध दाखले,जन्म,मृत्यू,आठ-अ तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतीतून दाखल्यांची गरज पडते आहेत.परंतु ते देखील वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी परिसरातील गावांचा जनतेकडून ऐकायला मिळत आहे
प्रशासक नेमलेल्या आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील ग्रामपंचायतीच्या
करोना महामारीमुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. परंतु,बहुतेक ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.त्याचा फटका गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.गावपातळीवरील स्वच्छता आणि पाणीपुरवठा यंत्रणा बहुतेक गावांत विस्कळीत झाली आहे.अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून ऐकायला मिळतात आहेत,

Copyright ©