यवतमाळ सामाजिक

स्वर्गीय माजी आमदार देवसरकर यांच्या घरी पालकमंत्री यांची सांत्वन पर भेट

____________________________
उमरखेड:उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार एडवोकेट आनंदराव देवसरकर यांचे गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले.1972 ते 1976 दरम्यान एडवोकेट आनंदराव देवसरकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष होते त्याच बरोबर 1999 व 1978 मध्ये त्यांनी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. यांच्या निधनाने एक अष्टपैलू नेता गमावल्याचे दुःख आहे. असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी स्वर्गीय आनंदराव चे देवसरकर यांच्या राहत्या घरी चातारी याठिकाणी देवसरकर कुटुंबीयांचे सांत्वन पर भेट दिली असता म्हटले.या वेळी आमदार ख्याजा बेग,पराग पिंपळे,राजेंद्र गायकवाड ,शंकर तलंगकर,उमेश ठाकरे,दत्तराव शिंदे,अनिल कदम,गजानन बोनसले ,बालाजी आगलावे,अरविंद माने,बंटी माने गजानन माने, संतोष जाधव शिवसेना अमोल चव्हाण, सुदिर तवर आदि उपस्थित होते.

Copyright ©