यवतमाळ सामाजिक

गृहरक्षक दलातील युवकाने वृध्द आश्रमात काय केले!

हिवरी येथील युवकाचे होत
आहे सर्वत्र कौतुक

यवतमाळ जिल्हा गृहरक्षक दलात कार्यरत असलेला हिवरी येथील युवक विवेक देविदासराव ससनकर याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत सर्वांची मने जिंकली, विवेक हा यवतमाळ जिल्हा गृहरक्षक दलात कार्यरत असून तो या सोबतच आपले शिक्षण व केशकर्तनालय चालवितो. परंतु हे करीत असतानाच समाजाकरिता आपल काही देणं आहे समाजाचं ऋण आहे हे मनाशी बाळगुन आपल्या कर्तव्याशी बांधील राहून विवेक मागिल वर्षीपासून आपला वाढदिवस संत दोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार येथे साजरा करीत आला आहे. आणि हे करीत असतानाच आपल्याकडून वृद्धांची सेवा घडावी याकरिता अनाथ निराधार पितृतुल्य वृद्धांची दाढी व कटिंग करून त्यांना आनंद देतो तर एवढ्यावरच न थांबता वृद्धांना आपल्याकडील महागडे पावडर, लोशन, क्रीम चा देखील विवेकने वापर केला. व या सह आपले हे व्रत पूर्ण करताना अन्य स्त्री व पुरुषांची सुद्धा सेवा आपल्याकडून घडावी याकरिता खाऊचे वाटप देखील विवेकच्या वतीने करण्यात आले. विवेकनी सलग दुसऱ्या वर्षी साजरा केलेल्या या त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, विवेक कडून प्रेरणा घेऊन बेजबाबदारपणे पैसे न उडविता युवकांनी पुढे येत समाजातील दुर्लक्षित घटकाकडे लक्ष देऊन समाजातील गरजुना मदत करण्याकरिता युवकांनी व दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची आज गरज आहे या अनोख्या उपक्रमाने व प्रेरणा देणाऱ्या कार्यानी अनेकांचे मन भाराऊन गेले असाच आपला वाढदिवस प्रत्येकानी साजरा करावा असा संदेश या तरुणाने तरुणाईला दिला

Copyright ©