यवतमाळ राजकीय

किरण सर नाईक कोण?, यांनी काय केले! म्हणुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला

पैठनी व रोख वाटप करतांना शिक्षकांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले

शिक्षक मतदार संघाचे येत्या 1 डिसेंबर ला मतदान असुन अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार किरण रामराव सरनाईक यांच्या सह ईतर तिन शिक्षकावर आचार संहिता भंग केल्या प्रकरणी आर्णी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे
मतदारांना प्रलोभन देण्या करिता पैठनी व रोख वाटप करीत असल्याची माहिती यवतमाळ येथील भरारी पथकाला मिळाली असता भरारी पथकाने आर्णी शहरातील ड्रिम लँड सिटी परिसरातील एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली असता घटना स्थळा वरुन 49 पैठणी साड्या व 27 हजार रु रोख जप्त केले आहे
मंडळ अधिकारी आचार संहिता पथक प्रमुख राजेश अशोकराव नागलकर वय वर्ष 45 यांनी आर्णी पोलिस स्टेशनला याची फिर्याद दिली असुन फिर्यादीत खुशाल भाऊराव राठोड वय वर्ष 51 सहाय्यक शिक्षक शिवाजी शिक्षण संस्था वाशिम,शंकर रामचंद्र रोहि वय वर्ष 47 सहाय्यक शिक्षक शिवाजी शिक्षण संस्था वाशिम,पंजाबराव भीमराव पडघण वय वर्ष 53 सहाय्यक शिक्षक शिवाजी शिक्षण संस्था वाशिम हे मौकास्थळी आढळून आले तसेच मौकास्थळी वरील मुद्देमाला सह उमेदवार किरण रामराव सरनाईक यांच्या नावाची पाॅम्प्लेट,प्रचाराचे किचन व साहित्य मिळुन आले त्यामूळे अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारा करिता मतदारांना प्रलोभन देण्याच्या ऊद्देशाने पैठणी साड्या व रोख रक्कम बाळगून आचार संहितेचा भंग केल्याने अपक्ष उमेदवार किरण रामराव सरनाईक यांच्या सह वाशिम येथील वरील तिन्ही शिक्षकाच्या विरुद्ध कलम 188,171 (ई ) भादवी कलम 123 (1) (क) (ख) लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गुन्हा नोंद केला आहे
तसेच पुढिल तपास आर्णी पोलिस करीत आहे

Copyright ©