यवतमाळ सामाजिक

श्री संत खटेश्वर महाराज यात्रा पुण्यतिथी महोत्सवला ग्रहण कोरोनाचे

[ यावर्षी प्रथम यात्रा रद्द ]

जोडमोहा श्री संत खटेश्वर महाराज यात्रा म्हणजे परीसरातील २५ ते ३० गावामध्ये व प्रत्येक घरा घरात पाहुण्यांची सरबराई यावर्षी प्रथमच यात्रा महोत्सव रद्द झाल्याने लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थानअसलेले श्री संत खटेश्वर महाराज देवस्थानात निरुत्साह दिसून येत आहे
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सव दि.३०/११/२०२० सोमवार कार्तिक पौर्णिमेला आयोजित केला असता वाढत्या कोरोना महामारीने लाखो भाविक भक्तांना महोत्सवा पासून वंचीत राहावे लागेल
दिवाळी सणाला गर्दी पाहता कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ झालेली दिसून आले त्यामुळे खटेश्वर देवस्थान समितीने निर्णय घेऊन यावर्षी प्रथमच यात्रा महोत्सव पुण्यतिथी उत्सव रद्द करण्यात आले श्री संत खटेस्वर महाराज यात्रा म्हटले की ? जोडमोहा व आजूबाजूचे २५ ते ३० गावा गावामध्ये पाहुण्यांची सरबराई रेलचेल भाऊबीज ज्या बहिणी भावाला ओवाळण्याला याच्या यावर्षी मात्र हिरमोड झाले.
१०० वर्षाची परंपरा असलेली यात्रा महोत्सव पुण्यतिथी महोत्सव होणार नाही श्री संत खटेस्वर महाराज यात्रेला महाराष्ट्रातुन येणारे लाखोच्या वर भाविक भक्त यावर्षी मात्र कोरोना महामारीने महोत्सवापासून वंचित राहावे लागले

Copyright ©