यवतमाळ सामाजिक

प्रिती दरेकर दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2020 ने सन्मानित

वणी येथील प्रितीताई दरेकर ह्यांना २३ नोव्हेंबर २०२० ला मुंबई येथे पेनिनसुला या पंचतारांकित हॉटेलमध्ये दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या वेळी देशविदेशातील सामाजीक कार्यकर्त्ये उपस्थित होते. प्रितीताई गेल्या सात वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आजपर्यंत सहा राज्यस्तरीय कवि संमेलने आणि सात पुरस्कार समारंभ विविधस्तरीय कार्यक्रम राबवून तब्बल सातशे चाळीस सामाजीक पुरस्कार समाजवीरांना प्रदान करण्यात आले आहे. त्यापैकी १०१ पुरस्कार कोविड १९ च्या काळात समाजाचा आधार बनुन राहीलेल्या सामाजीक कार्यत्यांना प्रदान केले गेले आहेत, हि बातमी दादासाहेब फाळके संस्थेपर्यंत पोहचली तेव्हा प्रितीताईंच्या उल्लेखनीय कार्याची दखल घ्यावी म्हणून ताईंना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड २०२० प्रदान करण्यात आला.
समाजाप्रती असलेले प्रेम आणि समाजबांधीलकी प्रितीताईंच्या कार्यातून आणि धडपडीतून नेहमीच दिसून येते. सन २०१९ च्या जून महीन्यातील पहिल्याच शैक्षणिक सत्रात ग्रामीण भागातील निराधार मुलींचा शिक्षणाचा खर्च त्यानी लोकवर्गणीतून केला होता वह्या, पुस्तके, दप्तर आणि गणवेश इत्यादी मदत ह्या निराधार मुलींना लाभली होती.
बेटी फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या काही वर्षात निराधार मुलींना आधार देणारे बालीका आश्रम सुरु करण्याचा प्रितीताईंचा माणस आहे, त्या अनुषंगाने तयारी चालू असल्याचे ह्यावेळी बोलतांना त्यांनी सांगीतले. समाजात मूर्ती लहान किर्ती महान असे आप्तमित्र ताईंना संबोधू लागले असून हिच धडपड, जिद्द आणि चिकाटी कायम मनाशी बाळगून सामाजीक कार्याचा घेतलेला वसा पूर्ण करण्यासाठी आणि नविन सामाजिक जबाबदारऱया व नविन आव्हान पेलण्यासाठी बख देणारा हा दादासाहेब फाळके पुरस्कार असून सर्व स्तरांवरुन प्रितीताईचे कौतूक होत आहे.

Copyright ©