यवतमाळ सामाजिक

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून विचारपूस

यवतमाळ : पारवा वन परीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिची राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जावून भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.
26 नोव्हेंबर रोजी वन परिक्षेत्र पारवामध्ये चापाच्या दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान मौजा बधारा ( टाकळी ) येथील सेनापती विजाराम राऊत (वय ३६ वर्ष), तसेच सुरज शंकर निकोडे (वय १७ वर्षे) हे दोघेही कुली सहवन क्षेत्रातील कक्ष क्र .१४८ लगत मुघलवार यांच्या मालकी क्षेत्रानजीक काम करीत असतांना अचानक निकोडे यांनी तेथून पळ काढला. यावेळी श्री राऊत बकरी चारत होते. त्यावेळी अचानक वाघाने शेताच्या लगत झाडीझुडपा मधून श्री . राऊत्त यांच्यावर हल्ला केला. तेव्हा त्यांचा सोबती सुरज निघून गेला. सेनापती राऊत हे वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याबाबत गावकऱ्यांनी वन कर्मचान्यांना कळविले. पारवा वन परिक्षेत्र अधिकारी व इतर वन कर्मचारी तात्काळ ग्रामीण रुग्णालय पारवा येथे पोहचले. जखमी राऊत यांचेवर तात्काळ डॉक्टरांनी प्राथमिक औषोधोपचार केले . त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर जखमी इसमास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरीता हलविण्यात आले . श्री . राऊत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून सुटका करण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगीतले.
रुग्णालयातुन सुटका झाल्यानंतर श्री . राऊत यांना वन विभागामार्फत शासकीय नियमानुसार मदत देण्यात येईल . सदर घटना घडलेल्या परिसरात वन कर्मचा – यांची गस्त वाढविण्यात आलेली आहे

Copyright ©