आर्णी/
तालुक्यात परतीच्या पावसाने बळीराजाचे अतोनात नुसकान झाले,त्या नंतर कापाशीवर बॉण्ड अळी ने हल्ला केला ,हाता तोंडाशी आलेले पिक अस्मानी संकटांनी हिरावून नेले बळीराजा पुरता मेटाकुटीस आला या वेळी बळीराजाला धीर देण्याचे काम सरकार ने केले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका अतिवृष्टी नुकसान भरपाई मधून वगळून बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महाविकास आघाडी कडून होताना दिसत आहे.
आर्णी तालुका नुकसान भरपाई मध्ये समाविष्ट करण्यात यावा करिता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना भूमिपुत्र शेतकरी संघेटना आर्णी तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले,निवेदन देते वेळी भूमिपुत्र शेतकरी संघेटनेचे आर्णी तालुका अध्यक्ष देवानंद पवार यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष धरम राठोड,बळीराम राठोड,हरी आडे,रमेश राठोड,राजाराम चव्हाण,दीपक राठोड,शेषराव चव्हाण,अनिता जाधव,वरलाल राठोड,आकाश जाधव,राजू राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment