Breaking News

शेतकरी शेतमजूर संघर्ष समिती घाटंजी तालुक्याच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

 

घाटंजी:व केळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वापून असलेल्या टिपेश्वर अभ्यारण्यातील वन्यप्राणी शेतकर्यांच्या पिकासह शेतकर्यांवर जिवघेणे हल्ले करत असून शेतकर्यांना शेतात काम करने सुध्दा अवघड झाले आहे. वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शेतकर्यांमधे भिती पसरली असून रब्बीचे पिक घेणे सुध्दा अवघड झाले आहे. शेतकरी अगोदर च अस्मानी संकट झेलत असतांना विद्युत विभागाने शेतकर्यांना रात्री विद्युत पुरवठा करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. दिवसा शेतीसाठी बारा तास विद्युत पुरवठा करावा व वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन आज शेतकर्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी शेतकरी शेतमजूर संघर्ष समिती च्या पदाधिकारी सह शेतकरी उपस्थित होते

Copyright ©