Breaking News

शरद येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक

तिघे जण गंभीर जखमी

घाटंजी:तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शरद येथे आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३च्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.या अपघातात तरोडा ता घाटंजी येथील तिन युवक गंभीर जखमी झाले असून तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तरोडा येथील तिन युवक दुचाकीने काही कामा निमित्त पारवा येथे जात असतांना विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी क्रमांक MH29Au 7301 या दुचाकीने MH29AF7495या दुचाकीला जबर धडक मारली या तालुक्यातील तरोडा येथील :गोलू सोयाम देविदास सोयाम अतिष मंगाम रा. सर्व तरोडा ता घाटंजी येथील रहिवासी असून ते गंभीर जखमी झाले आहे. जखमिंना तात्काळ यवतमाळ येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली. दोन्ही ही दुचाकी पारवा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. पुढील तपास पारवा पोलीस करत आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आले नव्हते.

Copyright ©