Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून , ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सुक्या मेव्याचे वाटप करून जन्म दिन केला साजरा

 【पत्रकार कुडवे यांचा अभिनव उपक्रम 】

दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयातील गरीब,गरजवंत रुग्णांना शनिवारी दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी व पत्रकार पुरुषोत्तम कुडवे यांच्या जन्मदिना निमित्ताने सुका मेव्याचे वाटप करण्यात आले.दिग्रस ग्रामीण रुग्णालयात अनेक आजारी रुग्ण दाखल होत असतात. सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे तसेच स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३० वी पुण्यतिथी तसेच पत्रकार पुरुषोत्तम कुडवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ड्रायफुडचे वाटप करून अभिनव उपक्रम राबविण्यात आला. बाळांतीन व कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाला रुग्णाचे नातेवाईक घरी नेल्या नंतर सुक्या मेव्याची भुकटी करून रुग्णाला देत असतात हीच बाब लक्षात घेऊन.पत्रकार पुरुषोत्तम कुडवे यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुणांना सुक्या मेव्याचे वाटप केले .या आगळ्या वेगळ्या उपक्रम राभवण्या मागे एक विशेष कारण आहे.राजकीय पुढारर्यानी सुध्दा एक एक फळ वाटप न करता सुक्या मेव्याचे वाटप करावे असे नागरिकांतून बोलल्या जात आहे. या अभिनव कार्यक्रमा स्थळी पत्रकार लुकमान खान, पुरुषोत्तम कुडवे, लक्ष्मण टेकाळे, प्रफुल व्यवहारे, अजित महिंद्रे, साजिद पतलेवाले, पोलीस पाटील अरुण कोरडे, गोविंद पाटील,ऍड.राहुल तुपसुंदरे, शुभम चव्हाण, प्रा.प्रितम गावंडे, किशोर कांबळे, उमेश भटकर, ऋषिकेश हिरास, सदानंद जाधव, जितेश बुरकुंडे, आकाश काशिकर, किशोर कांबळे, डॉ. वीरेंद्र अस्वार, डॉ.हर्षिल जाधव, कोवे मॅडम, गणेश पऊळ, गणेश सोनवाल आदी उपस्थित होते.

Copyright ©