Breaking News

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डतर्फे दुध उत्पादक डिजिटल पुरस्कार

यवतमाळ /प्रतिनिधी

2018 मध्ये राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड डेअरी सर्विसेस यांच्या तांत्रिक व टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहाय्याने सध्यास्थितीत इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात येणारी पहिली महिला दुध उत्पादक कंपनी आहे. सध्या दुध उत्पादक सदस्याची 5800 संख्या मजबुत आहे, कंपनीने कमी कालावधित दुध उत्पादक सदस्यांकडून थेट दुध खरेदीचे एक चांगले अत्याधूनिक व पारदर्शक मॉडेल ठेवले, दुध उत्पादकांना पारदर्शकतेकडे नेण्यासाठी एक कठोर पाऊल म्हणून उत्पादक महिला सदस्यांना दुधाचे बिल शंभर टक्के त्यांच्या संबंधित खात्यामध्ये थेट जमा केले जातात.
इंदुजा हि महाराष्ट्रातील डेअरी व्यवसायामधिल एक अग्रगण्य संस्थांपैकी आहे, ज्यांनी या प्रमाणात एवढ्या कमी कालावधित शंभर टक्के यश संपादन केले आहे, दुध उत्पादक महिला संदस्यांना बचतीसह अनेक फायदा झाल्याचे आढळले आहेत. दुध उत्पादक सदस्यांना डिजिटल दुध बिलाच्या देयकास प्रोत्साहित करण्यासाठी व पारदर्शकतेच्या हितासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या वतीने श्रेणी – 1 (वार्षिक दुध बिल देय रू. 50000 पर्यंत), श्रेणी – 2 (वार्षिक दुध बिल देय रू.50000 ते 100000), श्रेणी – 3 (वार्षिक दुध बिल देय रू. 100000 पेक्षा जास्त) श्रेणीनुसार निवड निकष घातले होते.
26 नोव्हेंबर 2020 रोजी राष्ट्रीय दुध दिवस व दुधकांतीचे जनक डॉ. वर्गीज कुरियन यांच्या वाढदिवसानिमीत्य राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी आनंद येथे आयोजित रंगबेरंगी ऑनलाईन कार्यकमात विजेता उत्पादक सदस्यांना हा डिजिटल सन्मान प्रदान केला. महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादक कंपन्यांमध्ये देय सदस्यांनी या सर्व 3 श्रेणीमध्ये विजय मिळविला हे सर्व भागधारक, मित्र व उत्पादकांना सांगणे हा इंदुजाचा एक सन्मान आहे. श्रीमती. माया गजानन गावंडे श्रेणी – 1 (बोरी अरब), श्रीमती. पंचफुला दत्तुजी बोपटे श्रेणी – 2 (जोडमोहा), श्रीमती. सज्जुबाई लक्ष्मण पवार श्रेणी – 3 (लोही) सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्याची इंदुजाला संधी प्राप्त झाली.
प्रत्येक विजेत्यास रू. 5000 रू. आणि राष्ट्रिय डेअरी विकास बोर्ड कडून प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात आले. या पवित्र पुढाकारासाठी इंदुजा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिकंदर मुलानी यांनी राष्ट्रिय डेअरी विकास बोर्ड यांचे आभार मानले आहे.

Copyright ©