यवतमाळ राजकीय

सामान्य जनतेचे विजकपात केली तर परिणाम भोगावे लागतील…. ढाणकी उपकेंद्रास मनसेची धडक….

यवतमाळ

काल यवतमाळ जिल्हा मनसेच्या वतीने सरकारच्या अवास्तव वीजबिल विरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने ढाणकी उपकेंद्रातून मनसेला तक्रारी प्राप्त झाल्या या विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद येम्बडवार , जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे , तालुकाध्यक्ष सादिक शेख यांनी उपकेंद्रावर धडक दिली.या प्रसंगी मनसेने उपस्थित उपअभियंता वाघमारे यांना जनतेच्या परिस्थितीची माहिती देत मनसेच्या रोकढोक भूमिकेची माहिती देत येणाऱ्या काळात जर सामान्य जनतेला त्रास झाल्यास अथवा त्यांचे बिल न भरल्याच्या कारणाहून विजतोडणी केल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी विजमहामंडळ जबाबदार राहील असा इशारा या प्रसंगी देण्यात आला.
या भेटीदारम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम ढाणकी च्या त्रस्त नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांना मा.राजसाहेबांच्या भूमिकेची माहिती दिली.सोबतच येणाऱ्या काळात बिल भरण्यासंदर्भात कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी आल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांना संपर्क कण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष आनंद येम्बडवार यांनी केले. या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी मनसेच्या पद्धतीने विजसक्तीचा समाचार घेण्यात येईल असा इशारा या प्रसंगी चर्चे दरम्यान दिला.महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनसामान्याच्या प्रश्नावर कटिबद्ध असून जनतेने मनसेकडे संपर्क साधावा असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले.या प्रसंगी उपअभियंता वाघमारे यांनी विजमंडळाच्या कोणत्याही ग्राहकाला सक्ती करण्यात येणार नाही असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.या प्रसंगी प्रामुख्याने हिरासिंग चव्हाण, तौसिफ सैय्यद, सिद्धार्थ घुगरे, निसार पठाण,मुकुंद जोशी,गुड्डू सैय्यद व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©