यवतमाळ सामाजिक

वाचनायल स्थापन करून संविधान दिन साजरा

  1. ( डोळंबावासीयांचा स्तुत्य उपक्रम )

    आर्णी (प्रतिनिधी): तालुक्यातील डोळंबा येथील युवकांनी संविधान दिनाचे औचित्य साधून वाचनालय स्थापन करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
    गेली काही महिन्यांपासून डोळंबा हे गाव एट्रोसिटी च्या तब्बल तीन प्रकरणामुळे प्रकाश झोतात आले होते. गावात अवैध धंदे फोफावल्यामुळे तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. गावातील युवकांना गुन्हेगारी विळख्यातून मुक्त करण्याचा डोळंबा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या सदस्यांनी निश्चय केला असून त्यासाठी ते गावातील समाज मंदिरात विविध उपक्रम राबविण्याची सुरुवात केली. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथ वाचन, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी यासारखे उपक्रम राबवून युवकांची महापुरुषांच्या विचाराशी नाड जोडण्याचे कार्य युवा विचारमंचाचे सदस्य सातत्याने करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज संविधान दिनाचे औचित्य साधून युवा विचारमंचाच्या युवकांनी वाचनालय स्थापन केले. या वाचनालयाचे उदघाटन वंचित बहुजन आघाडी चे आर्णी तालुका प्रमुख व आर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष गणेश हिरोळे, निलेश राठोड, मजहर हुसेन, निलेश नाईक, महादेव लंबे, नागोराव बन्सोड, आरिफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या वाचनायलाच्या रोपाचे मोठे वटवृक्ष होऊन वाचनालयाच्या माध्यमातून मोठं मोठे अधिकारी निर्माण होतील असा आशावाद गणेश हिरोळे यांनी व्यक्त केला. तसेच आर्णी पत्रकार संघा तर्फे 1 हजार, सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था आर्णीच्या वतीने 1 हजार, भारतीय बौद्ध महासभा आर्णीच्या वतीने एक हजार, तसेच डोळंबावाडी युवा मंचाच्या वतीने 2 हजार रुपयांची मदत वाचनायलास जाहीर करण्यात आली. त्यानंतर 20/11 च्या आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड चे दिनेश पतंगे, संजय राऊत, बिरसा ब्रिगेडचे राजेश पारधी, अनिल डुकरे तसेच चेतन इंगळे, सुरज भगत, सुजित पाटील, कमलेश खरतडे, संदेश भगत,विकास सरोदे,सुमेध कांबळे, सुमेध वानखडे, सुरेश वानखडे, मंगल शिंदे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन भगत व निलेश जाधव यांनी केले, सूत्रसंचालन रुपेश काटकर व अतिष जाधव तर आभार धम्मपाल भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर जाधव,जीवन भगत,पवन भगत,योगेश गावंडे,विजय पाटील,हंसराज वानखडे,आकाश जाधव, प्रमोद पारधी व युवा विचारमंचाच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

  2. मुख्यसंपादक: ओंकार चेके
  3. जाहिराीसाठी व बातम्यांसाठी संपर्क साधावा
    1. ७०८३६२४३३३
Copyright ©