यवतमाळ सामाजिक

वघारा टाकळी येथे वाघाने केला एका ईसमावार हल्ला

घांटाजी:     तालुक्याच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या टिपेश्वर अभ्यारन्या ला लागून असलेल्या घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४वाजताच्या सुमारास गावातील शेळकी शेळ्या चारण्यासाठी नेहमीप्रमाणे गावातील  सावंगी वघारा पादंण रस्त्याने चारण्यासाठी घेऊन घेला असता लगतच्या नाल्यात दबा धरून बसलेल्या वाघाने शेळकी सेनापती बिजाराम राऊत यांच्या वर हल्ला केला हल्ला करताच सेनापती बिजाराम राऊत यांनी आरडाओरडा केल्याने लगतच्या शेतात असलेले शेतकरी शेतमजूर धावून आले आणि वाघाच्या तावडीतून सेनापती बिजाराम राऊत यांची कशी बशी सुटका केली. सदर जखमी ईसामाला प्रथम उपचारासाठी पारवा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले . वृत्त लिहेपर्यंत वनविभागाला माहिती कळविण्यात आली नव्हती

*विशेष प्रतिनिधी*
*श्रीकांत देशमातुरे*
*कळंब*
*यवतमाळ*

Copyright ©