यवतमाळ सामाजिक

लग्नाचेआमिष देऊन अल्पवयीन मुलीवर करीत होते अत्याचार ,ग्रामीण पोलिसाच्या सतर्कतेने दोघालाही दाखवली तुरुंगाची वाट

यवतमाळ:प्रतिनिधी

एका अल्पवयीन मुलीला लग्नाची आमिष दाखवून तीचं शारीरिक शोषण केले.दरम्यान लग्न करण्यास नकार दिल्याने अखेर त्या पिडीतेने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करताच पिडीतेच शारिरीक शोषण करणाऱ्या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शरद येथील प्रसाद उर्फ अविनाश संजय कांबळे आणि अंकुश जीवन राठोड, रा जांब या दोघांनी अल्पवयीन मुलींना लग्नाचं आमिष देऊन यातील अंकुशने पुणे येथे पळून नेले होते त्याला गजानन करेवाड याच्या मार्गदर्शनाखाली सुरेश झोटींग व त्याच्या सहकाऱ्यांनी अटक केली तर एकास शरद येथुन अटक केली दोन्ही मुलींचे वय १७ वर्ष असल्याचं सांगण्यात आले तर या दोघांवर कलम ३६३,३६६,( अ )३७६(२) असे गुन्हे दाखल करण्यात आले

Copyright ©