यंदाची दिवाळी गोंदियातील आदिवासी बांधवांसोबत.
गोंदिया जिल्हा पोलीस दलाचा अभिनव उपक्रम.
संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.28 ऑक्टोबर:-
भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळी सण हा प्रत्येक सधन/गरीब वर्गातील कुटुंब आपआपल्या मर्यादेनुसार साजरा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु उत्तर-पुर्व अशा पसरलेल्या आदिवासी 51 गावे ज्याची लोकसंख्या 10976 आहे. या आदिवासी भागातील शिक्षण घेत असलेले मुले मुली व ईतर आदिवासी जनता हि अत्यंत हलाखीच्या स्थीतित प्रपंच भागवीत असतांना अती दुर्गम भागात नक्षलवादाने होरपळलेली असल्याचे दिसून येते. त्यांना आपल्या तसेच कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक पाठबळ नाही. बहुतांश वेळा अर्ध नग्न अवस्थेत राहणे भाग पडते.
अशा हताश व आधुनिक युगापासून पिछाडलेल्या या समाजास प्रेमाची साद व मायेची फुंकर घालण्यासाठी दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलीस दल “यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत” हा उपक्रम राबवित आहे.यास्तव एक माणुसकीचा हात अशा आदिवासी जनतेच्या पाठीशी राहावा या उदात्त हेतूने आपण स्थानिक नागरिक, लहान मुलांकरिता तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनी करिता खालील प्रकारच्या साहित्यांची पूर्तता करून या आदिवासी बांधवांच्या आनंदात भर घालू शकता.
नोटबुक, वह्या, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, जेवणाचा डब्बा, दप्तर, कंपास, सोलर लॅम्प. गादी (लहान मुलांसाठी), शर्ट/पॅन्ट पीस, धोतर, लोअर, टी शर्ट, साड्या, पातळ, टॉवेल, फ्रॉक, ल्यागिन, बांगड्या, चप्पल, शूज, स्पोर्ट टी शर्ट/पॅन्ट. स्टील ,ग्लास ,गंज /पातेले ,डब्बे. मिठाई ,सोनपापडी ,चिवडा ,फरसाण.
सामान्य ज्ञान पुस्तके ,कथा -कादंबऱ्या ,आत्मचरित्रावरील पुस्तके
क्रिकेट,बॅट ,बॉल ,व्हालीबॉल ,फुटबॉल ,बॅडमिंटन , कॅरम बोर्ड , ,व्हालीबॉल/बॅडमिंटन नेट.
वरील साहित्यासाठी रोख रक्कम न देता साहित्य स्वतः खरेदी करून द्यावे .वरील साहित्य जो कोणी आदिवासी बांधवांस देण्यास इच्छुक असेल त्यांनी खालील पत्यावर ट्रान्सपोर्ट ने पाठवावे . जर आपणास शक्य नसेल तर कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा .
• आपण आपला लोगो ,नाव कपड्यावरती मुद्रित करू शकता .
सदरचे साहित्य अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, देवरी जि. गोंदिया येथे जमा करण्याची शेवटची दिनांक 12/11/2020 आहे.
ट्रान्सपोर्ट करीता पत्ता अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, देवरी जि. गोंदिया (महाराष्ट्र) 441901,संपर्क
विजयकुमार धुमाळ, वाचक, सपोनि. अपर पोलीस अधीक्षक, देवरी
– 7744866333
07199 225150,ई मेल आयडी addlspgondia@gmail.com,
addlspgondia.gon@mahapolice.gov.in अधीक माहिती साठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Add Comment