नवेगावबांध येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे विधिवत उद्घाटन.
संजीव बडोले, प्रतिनिधी .
नवेगावबांध दि.8 नोव्हेंबर:-
नवेगाव बांध येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोर च्या येथील उपबाजार यार्डात दि.8 नोव्हेंबर रोज रविवारला 12.30 वाजता लक्ष्मी भात गिरणी अर्जुनी मोरगाव च्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काटापूजन भागवत पाटील नाकाडे व लक्ष्मी भात गिरणी च्या अध्यक्ष कांताबाई पाऊलझगडे यांनी काटा पूजन करून आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी
संचालक मंडळाच्या उपस्थितीत आधारभूत धान खरेदी चा शुभारंभ कार्यक्रमाला भात गिरणीचे उपाध्यक्ष राकेश लंजे, प्रमोद पाऊलझगडे, टिकाराम बोरकर, बंसिधर लंजे, भोजराम रहीले, मनोहर शहारे, बाबूराव गाहणे, देविका बाई हातझाडे, मदन सहारे माणिक घनाडे, विजय सिंह राठोड हे संचालक उपस्थित होते. तलाठ्याकडून अद्यावत सातबारा व याद्या मिळाल्यानंतर उद्यापासून रीतसर धान्य खरेदीला सुरुवात होईल. असे यावेळी सांगण्यात आले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे आधारभुत खरेदी केंद्रावर धान खरेदी केली जाईल. याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, नामदेव डोंगरवार, देवाजी कापगते, माजी पंचायत समिती उपसभापती जगदीश मोहबन्सी, ऋषी पुस्तोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे ,सत्यवान चांडक, ओमप्रकाश काशीवार, शालिक नाकाडे यांच्यासह नवेगावबांध परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Add Comment