बाल हक्क सप्ताह व बाल दिवस साजरा करणेबाबत
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांना बालकांचे हक्क, बालकांचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने दिनांक १४/११/२०२४ ते २०/११/२०२४ यादरम्यान बाल हक्क सप्ताह साजरा करणेबाबत सूचना प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने बाल हक्क सप्ताहाची सुरुवात शासकीय बालगृह/निरीक्षणगृह यवतमाळ येथून करण्यात आली. त्यासोबतच बाल दिवस सुद्धा साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शासकीय बालगृह/निरीक्षणगृह यवतमाळ येथील काळजी व संरक्षणाची गरज असणारे १० व विधी संघर्षग्रस्त ६ बालके उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, मा. बाल कल्याण समिति सदस्य अनिल गायकवाड, मा. बाल कल्याण समिति सदस्या कु. वनिता शिरफुले, मा. बाल न्याय मंडळ सदस्य राजू भगत, मा. अधीक्षक गजानन जुमळे, मा. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, संरक्षण अधिकारी संस्थात्मक अविनाश पिसूर्डे, लेखापाल स्वप्नील शेटे इत्यादि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते बाल हक्क सप्ताहाचे ऊटघाटन करण्यात येऊन भारताचे प्रथम पर्यंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रतिमेस पुष्पहार चढविण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर यांनी बालकांचे हक्क,शिक्षण,बाळकांचे भविष्य उज्वल बनविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले त्यासोबतच बाल दिवस व बाल हक्क सप्ताह बाबत उपस्थित सर्व प्रवेशीत बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना शासकीय बालगृहाचे अधीक्षक गजानन जुमळे यांनी केले व आभार प्रदर्शन संरक्षण अधिकारी संस्थात्मक अविनाश पिसूर्डे यांनी केले.
Add Comment