यवतमाळ सामाजिक

भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन

भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन

दिवाळी व धन्वंतरी जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महावीर नगर टी व्ही शोरुम च्या मागे करण्यात आले या शिबिरात विविध आजाराच्या तपासण्या करण्यात येत आहे या मध्ये

संपूर्ण आरोग्य, हृदय रोग, मधुमेह, रक्त तपासणी व वैद्यकीय शिबीर.घेण्यात येणार आहे रोजची कामं करतानाही छातीत वेदना होणे, चक्कर येणे, पायांवर सूज, दम लागणे अशी लक्षणं किंवा डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणा असे आजार असतील तर तपासणी करून घ्या.वेळीच केलेल्या तपसण्या आपल्याला चांगले आरोग्य देऊ शकतात! हे शिबिर दि. 27,28,29 ऑक्टोबर 2024 l सकाळी 8 ते 11 पर्यन्त

हृदय विकार तपासणी व रक्त चाचण्या  या करिता मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागते यां तपासणीला जवळपास 3200/- इतकी रक्कम असून ह्या तपासण्या केवळ ₹599/-मध्ये.करण्यात येणार आहे याची प्रत्येक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा  असे आवाहन डॉ.सौरभ एस.डोळे यांनी केले या शिबिरात ईसीजी ,हार्ट रेट,एस. पी. ओ2 ,रँडम ब्लड शुगर,बीपी,बॉडी मास इंडेक्स (BMI) हाईट- वेट वैद्यकीय सल्ला तर यात महत्वाच्या सूचना 1) रक्त तपासणीपूर्वी कमीतकमी 12 तास उपाशी असणे आवश्यक आहे. रक्त घेण्यासाठी आपली फक्त 05 मिनिटे वेळ लागणार आहे. लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी  9767655207,8010380124 या क्रमांकावर संपर्क करावा.असे डॉ. वैष्णवी सौरभ डोळे यांनी केले.

Copyright ©