कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक प्रविण्यप्राप्त आर्णी च्या जिशान चा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभाग आर्णी तालुक्याच्या वतीने जिशान शेख यांचा शाल, पुष्पगुछ आणि मिठाईने तोंड गोड करून सत्कार करण्यात आला.
पुसद येथे विभागीय स्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत आरणीच्या मातीचा श्री म. द. भारती शाळेचा विध्यार्थी जिशान रज्जाक शेख ने अव्वल प्रथम क्रमांक पटकावून आर्णी शहरा सोबत यवतमाळ जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. कुस्ती म्हटलं कि मराठवाड्यातील, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याचेच नाव पुढ येतात. परंतु जिशान ने यवतमाळ जिल्ह्याचे नाव लौकिक करून आपल्या यवतमाळ वासियांना असा विचार करायला काही हरकत नाही कि समोर चालून यवतमाळ जिल्ह्यातून पण दुसरा सिकंदर तयार होऊ शकते अशी अपेक्षा आम्हा सर्व यवतमाळ वासियांना जिशान शेख याच्या कडून आहे. कुस्तीमध्ये जिशान शेख ने प्रथम क्रमांक पटकावून त्याच्या सोबत त्याचं संपूर्ण कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत जिशान ने प्रथम क्रमांक पटकवीला असून त्याची राज्यस्तरीय निवड झाली आहे.या निमित्त आर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभाग आर्णी तालुक्याच्या वतीने शाल, पुष्पगुछ, मिठाईने तोंड गोड करून जिशान चा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यवतमाळ अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी, तालुकाद्यक्ष शहजाद शेख, शहराध्यक्ष रियाज खान, शाहिद सय्यद सोशल मीडिया प्रमुख, तणवीर काझी शहर प्रसिद्धी प्रमुख, यासिन शेख शहर प्रमुख, मोहिन शहा, सोहिल चव्हाण, नय्यर शेख, समीर शेख, महेबूब शेख, नईम शहा, आरेज शेख व असंख्य पधादिकारी उपस्थित होते.
Add Comment