प्रहार युवक संघटनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी प्रविण ढाकूलकर यांची निवड..!
येथील प्रविण ढाकूलकर यांची प्रहार यवतमाळ जनशक्ती पक्षाच्या जिल्हा युवक संघटना अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र प्रहार जिल्हा प्रमुख बिपीन चौधरी यांच्या हस्ते नुकतेच प्रविण ढाकूलकर यांना देण्यात आले आहे.
प्रविण ढाकूलकर गेले अनेक वर्ष प्रहार सेवक म्हनून काम पाहत होते. अवघ्या 20 व्या वर्षी समाजसेवेचा वसा घेत गेल्या 10 वर्षात अनेक कौतुकास्पद कामे त्यांनी केली आहेत.
यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख बिपीन चौधरी, प्रहार कळंब तालुका सचिव बंडू वाघाडे,तालुका कळंब येथील पवन धोत्रे, कैलास भगत, जोडमोहा ग्रामपंचायत सदस्य पवन जाधव, निखिल बोंद्रे प्रशांत भोयर, कैलास लीलारे,ओम चव्हाण, विपुल सखरापुरे,संदीप शेंदरे,अजय पडाल,यांनी प्रविण ढाकूलकर यांचे अभिनंदन केले
Add Comment