त्या आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख पटली
अर्जुना शिवारात 27 सप्टेंबर सकाळी 8.30 वाजता भंडारी ( शिवर ) येथील सुरेश भगवान शिंदे यांनी लिंबाच्या झाडाला दोर बांधुन आत्महत्या केली
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अर्जुना शिवारात भंडारी येथील तरुण सुरेश भगवान शिंदे वय 24 यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे आर्णी येथील मोबाईल गहान ठेऊन त्या पैशात काही मित्रा समवेत दारू पिली आणि तेथून आपल्या चुलत भावाच्या स्वानं प्रशिक्षण केंद्रावर आला तिथे कुणीच नसल्याने लिंबाच्या झाडाला दोर बांधून 8.30 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केली दिलीप जाधव यांच्या शेतात स्वान प्रशिक्षण केंद्र उभारले असून त्या ठिकाणी एक खोली आहे त्या खोलीला लागून एक लिंबाचे झाड आहे त्याच झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आले
हि घटना आज सकाळी आठ तीस वाजता घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे हा इसम कोण आत्महत्या मागील कारण काय हे अनुत्तरीत प्रश्न पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.ग्रामीण पोलीस स्टेशनचे खुशाल राठोड पुढील तपास करीत आहे
Add Comment