यवतमाळ सामाजिक

स्वच्छता ही सेवा स्वच्छता अभियान देवनळा येथे संपन्न

स्वच्छता ही सेवा स्वच्छता अभियान देवनळा येथे संपन्न

नेहरू युवा केन्द्र (माय भारत विभाग) युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यवतमाळ कार्यालया द्वारा यवतमाळ जिल्हातील युवकाना आवाहन करण्यात आले होते. त्याच अनुषगाने कळंब तालुक्यातील देवनळा या गावा मध्ये. दि. 23/9/2024 स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाला गावातील युवकानी उस्पुर्तक प्रतिसाद दिले. तसेच या उपक्रमाला ग्रामपचायत कर्मचारी पण उपस्थित होते.

या अंतर्गत गावातील प्लॉस्टिकच्या पिशवी ग्रामपंचायत परिसरातील केरकचरा गोळा करण्यात आले. या मध्ये 10 किलो कचरा गोळा करून कचरा कुंडी मध्ये टाकण्यात आले. या मोहिमेचे उद्दिष्टे एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लॉस्टिकच्या पर्यावरण आणि आरोग्यावरिल परिणामाबदल शिक्षित आणि जागरूकता निर्माण करणे होय, या उपक्रम मध्ये मनिष आडे, राजेश पवार,अजय राठोड, निलम राठोड, हंसराज चव्हाण,अजिंक्य जाधव,हिराचंद उईके,गोलू आडे,मयूर राठोड,संजय राठोड, मनोज चव्हाण,व इतर युवक उपस्थित होते नेहरू केन्द्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री सारंग मेश्राम सर व श्री अनिल ढेंगे सर यांच्या पुढाकाराने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Copyright ©