जिल्ह्यातील 108 ॲम्बुलन्स चे उद्यापासून चाके थांबणार
ए.डि.यम( जिल्हा सहाय्यक व्यवस्थापक) थोरात यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
ए. डी. एम. थोरात हे यवतमाळ येथे रुजू झाले तेव्हापासून आठवड्यातून किमान तीनच दिवस ऑफिसला कामावर राहतात व परत आपल्या गावाकडे निघून जातात तीन दिवस कामावर राहून लोकांच्या समस्या कशा भागणार हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे दोन ते तीन दिवस काम करून पूर्ण पगार घेणाऱ्यास जबाबदार कोण ? हे तपासण्याची अत्यंत गरज आहे.
ए.डी.एम महोदयांचे सांगणे आहे की माझं कोणीही काहीच करू शकत नाही तुम्ही माझी तक्रार कोठेही करू शकतात असे उलट सुलट प्रश्न करतात अशा दबंग अधिकाऱ्यास कोणाचा आशीर्वाद आहे असे 108 ॲम्बुलन्स कर्मचारी या संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच तालुका महागाव येथील 108 चे कर्मचारी चालक गजानन सोळंके यांना कोणतेही कारण नसताना थोरात यांनी खोटे आरोप करून बडतर्फ केले याचे जाब विचारण्याकरिता या संघटनेने जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन त्यांचे विचार प्रकट केले आहे जेणेकरून थोरात यांनी या कर्मचाऱ्यांस चांगली वागणूक द्यावी व बडतर्फ कर्मचारी पायलट गजानन सोळंके यांना कामावर परत रुजू करावे अन्यथा उद्या दिनांक 25 सप्टेंबर पासून 108 ची चाकी थांबणार असे आव्हान या संघटनेने केले आहे.
Add Comment