गुराखीचा नदीत पडून मृत्यू
अकोला बाजार येथील शेत शिवारात गुराखी नदीकाठी गाई चारत असताना नदी वरील बंधारा वरुन पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने गुराखी चा मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी घडली. भावराव लक्ष्मण नेवारे वय 65 वर्ष रा अकोला बाजार असे मृतकाचे नाव असून गावातील जनावरे चारून आपला उदरनिर्वाह करीत असे.
रविवारी गुराखी मृतक भावराव नेवारे हा घाटंजी रोड वर असलेल्या नदीकाठी जनावरे चारत होता आणि दुपारी 2.30 वाजे च्या सुमारास जनावरे परत घराकडे आणण्यासाठी नदीवरील बंधारा ओलांडत असताना पाय घसरला आणि घात झाला. ही बाब सोबत असणार्या दुसर्या गुराखीच्या लक्षात येताच गावात फोन करून नागरिकांना कळविले, नागरिकांनी नदीवर धाव घेत मृतक याला पाण्याच्या बाहेर काढले. ही घटना वडगाव जंगल पोलिस स्टेशनला मिळताच सपोनि संजीव खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भाऊराव बोकडे पोलिस कॉन्स्टेबल धनंजय शेखदार, अक्षय डोंगरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.
मृतक भावराव नेवारे यांच्या मागे पत्नी,तीन मुली असा आप्त परिवार आहे
Add Comment