Breaking News यवतमाळ

नागपूर तुळजापूर महामार्गावर उभ्या ट्रॅक ला ट्रॅव्हल्स ची धडक

नागपूर तुळजापूर महामार्गावर उभ्या ट्रॅक ला ट्रॅव्हल्स ची धडक

दोघांचा मृत्यू तर 2 जण जखमी

जवळा येथील चौधरी पेट्रोल पंप जवळील घटना

नागपूर तुळजापूर महामार्गावर कल दी. 21 तारखेला रात्री 1: 30 दरम्यान लोहा येथील ऐक ट्रक क्रमांक 8612 नंबरचा ट्रक नांदेड वरून उडीद भरून जात असताना जवळा येथील चौधरी पेट्रोल पंप जवळ त्याचा टायर पंक्चर झाला त्यामुळे गाडी चा टायर गाडी रोडच्या बाजूला लाऊन बदलवित असताना पाठीमागून उभ्या ट्रक ला सोलापूर वरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने धडक दिली त्यात ऐक ट्रक चा कँडॅक्टर व ऐक ट्रॅव्हल्स मधील प्रवासी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की पोलिस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीवरून वरील दोन्ही वाहने नांदेड मार्गावरून नागपूर येथे जात होते या दरम्यान जवळा येथील चौधरी पेट्रोल पंप जवळ ट्रक चा टायर पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करून टायर बदलवित होते तेवढ्यात मागून सोलापूर नागपूर जाणारी ट्रॅव्हल्स त्या उभ्या ट्रक ला मागून धडकली त्यामुळे तो ट्रक चा वाहक भगवान वागमारे वय 30 रा.लोह जिल्हा नांदेड हा ट्रक खाली दाबल्याने त्याचा मृत्यू झाला व तसेच ट्रॅव्हल्स मधील प्रवासी निखिल तुळसिराम साडोने वय 26 रा. देऊळी याचा देखील घटना स्थळी मृत्यू झाला आहे तर ट्रक चालक तुळसिराम कदम 40 रा. लोहा यांनी घटना स्थळी घडलेली माहिती दिली आहे.एम एच 40 बी जी 9966 असा ट्रॅव्हल्स चा क्रमांक असून एम एच 8612 असा उभ्या ट्रक चा क्रमांक आहे यावरून आर्णी पोलिस यांनी गुन्हे नोद केले आहे.

प्रवाशांनी मानले स्थानिक नागरिकांचे आभार

मध्य रात्री दरम्यान घडलेल्या या घटना स्थळी जवळा व शेलू गावातील नागरिकांनी घटनस्थळी धाव घेऊन मदत केली त्यानंतर बऱ्याच वेळा नंतर आर्णी पोलिसांची मदत पोहचली परंतु प्रशासनची मदत पोहचण्याआधी गावकऱ्यांनी अपघात ग्रस्तांना वेळीच मदत दिली त्यामुळे सर्व जखमी प्रवाष्यानी स्थानिक पोलीस प्रशासना ऐवजी जवळा येथील स्थानिक नागरिकांचे आभार मानले.

Copyright ©