यवतमाळ सामाजिक

वरझडी,वरुड येथील महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दारू बंदी साठी निवेदन

वरझडी,वरुड येथील महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दारू बंदी साठी निवेदन

यवतमाळ तालुक्यातील वरझडी,वरुड येथे अवैध दारूचा मोठा महापूर वाहत असल्याने येथील नागरिक आणि अल्पवयीन मुले दारू कडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याने गावातील शांतता भंग पावत आहे. छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टीवरून वाद तसेच अल्पवयीन मुले दारू पीत असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. दारू पुरते कमावणे आणि दारू पिऊन धिंगाणा घालणे एवढेच आजच्या तरुण पिढीला कळत असल्याने दिनांक 23 ऑगस्ट रोजी गावातील नागरिकांनी व महिलांनी ग्राम पंचायत वर धडक मारताच ग्राम पंचायत सरपंच यांनी ग्राम सभा घेऊन अवैध दारू विरुद्ध एकमताने दारू बंदीचा ठराव नागरिक, महिला यांच्या सही नुसार घेण्यात आला. त्या अनुषंगाने गावातील नागरिक आणि महिला यांनी अवैध दारूबंदी शिवसेना नेते यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळी उपस्थित शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, शहरप्रमुख चेतन सिरसाठ, युवासेना जिल्हा सरचिटणीस अक्षय ठाकरे, युवासेना उपतालुकाप्रमुख शितेष ठाकरे, राहुल कुंभारे तथा ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने होते.

Copyright ©