अकोला बाजार केंद्र शाळेचा ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने आयोजीत केलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जि.प प्राथमिक मराठी केंद्र शाळा अकोलाबाजार शाळेने तालुक्यातून गुणानुक्रमे तिसरा क्रमांक प्राप्त केला असून १ लक्ष रुपये बक्षीसाचे मानकरी ठरली आहे. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीद्वारे शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला,तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील उत्कृष्ठ सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे स्वागत केले .
जि.प .प्राथमिक मराठी केंद्र शाळा ही वर्ग १ ते ५ ची प्राथमिक शाळा असून या शाळेत २१९ विद्यार्थी शिक्षण घेतात . शाळेची उत्कृष्ठ गुणवत्ता , सुंदर व बोलका शालेय परिसर , आकर्षक रंगरंगोटी , वाचनालय , शैक्षणिक साहीत्य , डीटीटल शैक्षणिक सुविधा , महावाचन सक्रीय सहभाग, स्वच्छता मॉनिटर उपक्रम , इको क्लब , पर्यावरण पुरक वातावरण , भौतीक सुविधा , फर्निचर , स्वच्छतागृहे ,परसबाग , खेळ , क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये सहभाग आदी बाबींचे तालुका स्तरिय समिती द्वारे मुल्यांकन करण्यात आले . गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांचे मार्गदर्शना खाली विस्तार अधिकारी शिक्षण विद्या वैद्य,हिवरी केंद्राचे केंद्रप्रमुख दयाशंकर चितळकर , तळेगांव केंद्राच्या केंद्रप्रमुख अर्चना वासेकर यांचे चमूने सदर मुल्यांकन केले .
प्राथमिक शाळा असून देखील शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल गावचे सरपंच योगेश राजुरकर , उपसरपंच प्रविण मोगरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु वगारहांडे,उपाध्यक्ष सविता प्रविण नेवारे , सदस्य प्रकाश शेंद्रे , प्रकाश मोगरे,गजानन मडावी,स्वाती पवन वेट्टी , श्री इंद्रजीत नेवारे ,अलीमोददीन काझी,रेश्मा सलीमखान पठाण , सोनाली गणेश नेवारे , रेखा संतोष राजुरकर इत्यादींना शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थाचे अभिनंदन केले.या प्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक राधेशाम चेले,निलीमा बाराहाते , नम्रता बिसने , सोनाली पट्टे , तृष्णा मेश्राम , विवेक वाईकर , सुनिता नेवारे ,नंदा बोटरे उपस्थित होत्या.
Add Comment