हिंदू जनजागृती समितीच्या वतीने स्व. चन्नावार विद्यालय येथे प्रथमोपचार आणि स्वरक्षा प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन !
सध्या धावपळीच्या जीवनामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अपघातग्रस्त रुग्णाला दवाखान्यात नेण्यापूर्वी प्रथमोपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात,
या दृष्टीने मुलांना माहिती व्हावी, यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि स्व. रामाजी चन्नावार विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा प्रथमोपचार सेवक श्री विजय जाधव यांनी ‘प्रथमोपचार काळाची गरज’ या विषयावर मुलांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले, त्यामध्ये प्रथमोपचार पेटीतील साहित्य, हृदय रोगावर छाती दाबन प्रक्रिया, नाडी तपासणी, A B C A B S पद्धती इत्यादी विषयी माहिती सांगण्यात आली, त्यानंतर समितीचे श्री दत्तात्रय फोकमारे यांनी ‘स्वरक्षा प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयी मुलांना मार्गदर्शन केले, यावेळी ते म्हणाले, सध्या मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे, त्याला आळा घालण्यासाठी प्रत्येक मुलीने स्वरक्षा प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
या शिबिराचा लाभ वर्ग ५ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी घेतला. या शिबिरासाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अपर्णा कोलतेवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी सोनल मावंदे, दिपाली जडीत,सुवर्णा इंगोले,जोशना भागडकर, शितल दिघडे, वैभव सरोदे, वैभव कुचेवार, कुणाल पेटकर,अंबरीश घोडे,मुकेश खंडारे इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.
Add Comment