संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनची कार्यशाळा
जिल्ह्यात फळपिकाच्या क्षेत्रात लक्षनीय वाढ
दिग्रस येथे ५/९/२०२४ रोजी कृषि विभाग आत्मा यवतमाळ व कृ.वि.कें. सांगवी रे. यांच्या संयुक्त विद्यमाने संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा जिजामाता संस्कृतिक सभागृह, दिग्रस येथे येथे घेण्यात आली. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना संत्रा फळबाग लागवड व त्याचे करावयाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना त्यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिग्रस तालुक्याचे तहसीलदार श्री मयूर राऊत उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी दिग्रसश्री शिवसिंग राजपूत नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा चे व्यवस्थापक श्री अशोकरावजी ठाकरे आत्मा दिग्रस चे अध्यक्ष श्री रामभाऊ मारशेटवार व प्रमुख मार्गदर्शक श्री निवृत्ती पाटील विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) कृषी विज्ञान केंद्र वाशिम व कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेचे श्री मयूर इंगोले विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), डॉ. विपुल वाघ, अक्षय इंजाळकर, राहुल इंगोले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री देवानंद राऊत विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) यांनी तर आभार प्रदर्शन आत्माचे श्री सागर बोंडे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक निवृत्ती पाटील सर यांनी संत्रा पिकाच्या लागवडीमध्ये लागवडीपासून ते बहार नियोजना पर्यंत येणाऱ्या सर्व अडचणी व त्यावर करायच्या उपाययोजना याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच प्रश्नोत्तराच्या तासामध्य शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले.यावेळी तसेच तालुका कृषी विभाग कृषि सहाय्यक व पर्यवेक्षक व कृषी विज्ञान केंद्र सांगवी रे. चे शास्रज्ञ व दिग्रस तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add Comment