यवतमाळ सामाजिक

कत्तलखाने व मास विक्री दुकाने बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सकल जैन समाजाचे निवेदन

कत्तलखाने व मास विक्री दुकाने बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सकल जैन समाजाचे निवेदन

जैन धर्मियांचे पयुषण पर्व व सवत्सरी पर्वा निमित्त निमित्त दि 7

ते 17 सप्टेंबर पर्यंत संवत्तसरी पर्व साजरा करण्यात येत आहे याच कालावधीमध्ये गणेश स्थापना पण होत असते उच्च न्यायालयाच्या आदेश क्रमांक 26 591 / 2024 दिनांक 29. 8.2024 नुसार यवतमाळ जिल्ह्यातील तालुका प्रशासन तालुका कार्यालय नगरपालिका नगरपंचायती ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाला आदेश देऊन कत्तलखाने व मांस विक्री ची दुकाने तसेच मास विक्री केंद्र आदेश देऊन बंद ठेवण्यात यावी तसेच आदेशाची अहवेलना होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलावी या आशयाचे निवेदन सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ. पोलीस अधीक्षक यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकारी यवतमाळ तहसीलदार यवतमाळ यांना एका निवेदनातून डॉक्टर रमेश खिवसरा; सुभाष जैन ; विजय कोटेचा; विजयकुमार बुंदेला; उमेश बैद एडवोकेट विजय चानेकर; रवींद्र बोरा व सकल जैन बांधवांनी केली आहे

Copyright ©