चक्रधर स्वामी हे आद्य सुधारक
आदिवासी सेवा गोविंदराव भिसे
समाजाच्या वाईट चालीरीतीवर प्रहार करून स्त्री पुरुष समानतेच्या कार्यासाठी झटणारे श्री प्रभू चक्रधर स्वामी हे आद्य सुधारक आहेत असे प्रतिपादन आदिवासी सेवक गोविंद भिसे यांनी केले.
स्व. भारत सिंह ठाकुर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ च्या राष्ट्रीय सेवा योजना पथक च्या वतीने समाज सुधारक श्री प्रभू चक्रधर स्वामी यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये चक्रधर स्वामी यांच्या कार्याचे स्मरण केल्या गेले. मराठी साहित्याची गुढी उंच नेण्यामध्ये महानुभाव साहित्य विषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिल्या गेली. समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न यावेळी विद्यार्थ्यांना सांगितल्या गेले. स्थानिक जवळा येथे श्री दत्तप्रभू ची खांड असून त्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या साहित्यात आहे असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमां चे संचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योतिपाल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला मान्यवराची उपस्थिती होती
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
Add Comment