रुंझा येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन व राष्ट्रीय शिक्षक दिन संपन्न झाला
दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला बाबासाहेब देशमुख विद्यालय रुंझा ता. केळापूर जि. यवतमाळ येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन व राष्ट्रीय शिक्षक दिन संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एम आडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे शिक्षक ए पी चौधरी सर श्री वाय आर घोडे सर होते बि .डी .गेडाम डी .आर .कोकाटे सर आदित्य निबूदे विद्यालयाचे लिपिक विजय पोलेवार बाबू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाय आर घोडे यांनी सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या लीळाचरित्र या ग्रंथाविषयी माहिती दिली मराठीचा पहिला चरित्र ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये महानुभव पंथाचा नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विषयी माहिती दिली आहे त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान, नियम, वचने ,तत्वे, ज्ञान, लीळाचरित्र ग्रंथामध्ये आहे तसेच शिक्षक दिनाविषयी भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्या विषयी माहिती दिली तर विद्यालयाचे शिक्षक श्री ए पी चौधरी सर यांनी आठशे वर्षांपूर्वी समाज क्रांतीची सुरुवात करणारा खरा नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बी. एम .आडे सर यांनी महाराष्ट्र ही वीरांची भूमी साधू संतांची भूमी ही शिवरायाची भूमी म्हणून महाराष्ट्राला सर्वजण ओळखतात महाराष्ट्रात अनेक साधुसंत जन्मले व त्यांचे नाव इतिहासात अजराअमर आहे व शिक्षक दिनाचे महत्त्व विषद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .जरीन तिगाले नी केले तर आभार प्रदर्शन आदित्य निबुदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंता वखरे व गजानन ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले
Add Comment