बळीराजाला साथ द्या, सोयाबीनला सहा हजार भाव द्या
भारत कृषीप्रधान देश असून मुळा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी शेतकरी आपला जोडीदार सखा सोबती असलेला बैल याला सजवून धुवून पुरणपोळी खाऊ घालून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात याच पोळ्याच्या औचित्य साधून कळंब तालुका जोडमोहा येथे गावातील नव तरुणांनी पोळ्याच्या दिवशी बैल सजवून त्यांच्या अंगावर विविध संदेश लिहिले ते संदेशाच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांनी संदेश दिलेला आहे. “सोयाबीनला सहा हजार भाव द्या”, “कापसाला दहा हजार रुपये भाव द्या”, “सोयाबीन ले भाव नाही, त भाजपले मत नाही “, “बळीराजा तू रायशीन मौन,तर तुह्य आयकन कोण “, महाराज आम्हाला माफ करा अश्या आशयाचे संदेश लिहून पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी एक प्रकारे आंदोलन केले. यामुळे गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला परंतु पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होता आले नाही. बऱ्याच लोकांनी बैलांच्या पाटी वरती संदेश लिहून शेतकऱ्यांना आपल्या मागण्या पाठवल्या अशा प्रकारे पोळ्याच्या सण जोडमोहा गावात साजरा करण्यात आला.
अलीकडे समाज माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धती असताना पारंपरिक सणाच्या दिवशी आपल्या व्यथा मांडल्या.
शासनाने लवकर ओला दुष्काळ जाहिर करावा आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव द्यावा या अपेक्षा व्यक्त केल्या. या वेळी युवा शेतकरी प्रविण ढाकुलकर, बंडू वाघाडे, कैलास लिल्हारे, प्रशांत भोयर, निलेश ढाकुलकर, गोपाळ शर्मा, मनीष ढाकुलकर, प्रमोद लिल्हारे, व जोडमोहा येथील शेतकरी उपस्थिती होते.
Add Comment