यवतमाळ सामाजिक

विश्व हिंदू परिषद स्थापना दिन कार्यक्रम यवतमाळ नगरमध्ये १ सप्टेंबर रोजी साजरा होणार

विश्व हिंदू परिषद स्थापना दिन कार्यक्रम यवतमाळ नगरमध्ये १ सप्टेंबर रोजी साजरा होणार

गेल्या ६० वर्षापासून जगातील समस्त हिंदू करिता व देव, देश, धर्म या ब्रीद वाक्यावर काम करणारी संघटना म्हणजेच विश्व हिंदू परिषद.

विश्व हिंदू परिषद आपले शष्टपूर्ती वर्ष साजरा करीत असून त्याचा जाहीर कार्यक्रम यवतमाळ शहरामध्ये आज दिनांक ०१-०९-२०२४ रोजी उत्सव मंगल कार्यालय, अवधूतवाडी, यवतमाळ येथे दुपारी ४.०० वाजता साजरा होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री.शंभूनाथ तिवारी, प्राचार्य महर्श्री विद्या मंदिर, यवतमाळ व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.श्री.गणेश महाराज निमजे उपस्थित राहणार आहे. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री.गोविंदजी शेंडे, महाराष्ट्र, गोवा क्षेत्र मंत्री, विश्व हिंदू परिषद (मुंबई क्षेत्र) हे मार्गदर्शन करणार आहे.

तरी आज रोजी होणाऱ्या विश्व हिंदू परिषद स्थापना दिनाच्या कार्यक्रमात यवतमाळ शहरातील समस्त हिंदू बंधू व भगिनींनी उपस्थित राहावे असे आव्हान गोविंद मोर, अध्यक्ष, विश्व हिंदू परिषद, यवतमाळ यांनी केले आहे.

Copyright ©