भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन सर्व शासकीय विभागात साजरा करा
( बाबासाहेब देशमुख विद्यालय येळाबारा येथे निवेदन)
( यवतमाळ ) महाराष्ट्र शासनाने भगवान सर्वज्ञ श्री “चक्रधर स्वामी अवतार दिन”महाराष्ट्रातील सर्व शासकीय विभाग सर्व शाळा महाविद्यालय 5 सप्टेंबर 2024 ला साजरी करावी अशी मागणी बाबासाहेब देशमुख विद्यालय येळाबारा येथील प्राचार्य यांच्याकडे करण्यात आली.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी व सर्व शासकीय विभागांना दिले आहे
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती साजरी करण्याचे निवेदन येळाबारा तालुका जिल्हा यवतमाळ च्या वतीने प्राचार्य बाबासाहेब देशमुख विद्यालय येळाबारा यांना देण्यात आले निवेदन देताना येळाबारा वागदा येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री .प्रकाश झांमरे( माजी सरपंच) श्री .बाळकृष्ण काळे श्री .गोकुळ बोपटे समाधान काकडे, शेखर काळे, नितेश सपकाळ, सुभाष चावरे ,प्रकाश काकडे ,समाधान अवथळे ,वसंता काळे ,माणिक भड, नितेश चौधरी, आदी उपस्थित होते .
Add Comment