यवतमाळ सामाजिक

शहरातील कृषी केंद्र चालकांची तपासणी संशयास्पद 

ता .प्र .निलेश नरवाडे

शहरातील कृषी केंद्र चालकांची तपासणी संशयास्पद 

पुन्हा खताचे नमुने कश्यासाठी : इतर कृषी चालकांना खूली सूट

महागांव तालुक्यात मागील काही महिन्यापासून बोगस कंपनीच्या खतांची विक्री जोमात सुरू होती. याचा सुगावा अमरावती व यवतमाळ पथकाला लागताच त्यांच्यामार्फत महागांव शहरातील काही कृषी चालकाची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही खतांचे नमुने अमरावती व यवतमाळ पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोबत घेतले होते. दोन ते तीन कृषी केंद्र चालकांची तपासणी करून शहरातील इतर कृषी केंद्र चालकांना या पथकाने एक प्रकारे खूली सूट दिली आहे. यांच्याकडून आर्थिक लाभ अधिकाऱ्यांना मिळत असल्याचे शहरातील नागरिकातून बोलल्या जात आहे. कृषी केंद्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून सुद्धा कृषी विभाग मात्र गप्प आहे. बोगस खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कार्यवाही करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशा मागणीने आता जोर धरला आहे.

मागील काही दिवसापूर्वी परवाना प्राधिकारी अधिकारी यांनी महागांव शहरातील एका कृषी केंद्र चालकाचा खताचा परवाना ६० दिवसासाठी निलंबित केला होता. व काल त्याच अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकाला एक खताचे पोते विक्री करण्यास भाग पाडले. परवाना निलंबित केलेल्या खताची विक्री अधिकाऱ्यांनी का करा लावली ? हा संशोधनाचा विषय आहे.

महागांव शहरासह तालुक्यात कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. अनेक ठीकाणी बोगस खते, औषधी, बिलात तफावत आढळून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्रावर कार्यवाही करून निलंबित करावे अशी मागणी होत आहे.

Copyright ©