पोलीस अधीक्षक साहेब पोलिसांचे हप्ते बंद करा -ऊ भा ठा सेनेची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ऊ भा. ठा.शिवसेने निवेदन देऊन पोलीस हप्ते घेऊन अवैद्द व्यावसा यास चालना देत आहे . जिल्हा पोलीस दलामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची मासिक (हप्ता)लाच घेण्याची पद्धत बंद करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, जिल्हा सचिव तुषार देशमुख हजर होते, या सोबतच पोलीस दलातील राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये कशाप्रकारे मासिक हप्ता घेण्यात येतो याचा तक्तासुद्धा पोलीस अधीक्षकांना देण्यात आला व राळेगाव येथील अवैध धंदे, मटका जुगार, अवैध दारू विक्री व तस्करी, अवैध गुटखा तस्करी व विक्री बंद करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आले
Add Comment