यवतमाळ सामाजिक

बुंदेला ॲड्स व दै. अमरावती दर्शन कार्यालयाचे थाटात शुभारंभ

बुंदेला ॲडस ‘द ब्रॅंड नेम’

तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांचे प्रतिपादन :

बुंदेला ॲड्स व दै. अमरावती दर्शन कार्यालयाचे थाटात शुभारंभ

जाहिरात क्षेत्रात मागील ४२ वर्षापासुन यवतमाळकरांच्या सेवेत अविरत सेवा कार्यकारणी बुंदेला ॲडस हे एक ‘द ब्रँड नेम’ आहे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले.ते बुंदेला ॲडस व दै.अमरावती दर्शन च्या जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.

तहसीलदार योगेश देशमुख यांचे शुभ हस्ते नुकताच बुंदेला ॲडस व अमरावती दर्शन कार्यालयाचा शुभारंभ जस्मित कॉम्प्लेक्स तलाठी कार्यालयासमोर चापमणवाडी यवतमाळ येथे थाटात पार पडला.यावेळी राजीव गांधी पंचायत राज समितीचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश देशमुख पारवेकर, माऊली पंत संस्थेचे अध्यक्ष जितेश नवाडे यांचे प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला.

पुढे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख म्हणाले की, यवतमाळ शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बुंदेला ॲडस जाहीरात एजंसी कार्यरत आहेत. आता त्याला वर्तमानपत्राची देखील साथ मिळाल्याने त्यांच्या कर्तुत्वात निश्चितच भर पडणार असून येणाऱ्या काळात त्यांच्या जाहिरात संस्थेच्या नावापूढे द ब्रँड हे विशेषण देखील निश्चितच लागेल, असे देखील ते म्हणाले.

या प्रसंगी उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्काराने सन्मानित यवतमाळ चे तहसीलदार योगेश देशमुख पारवेकर यांचा बुंदेला ॲड्स च्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जस्मीत कॉम्प्लेक्स चापमानवाडी मधील बुंदेला ॲड्स कार्यालया च्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरानी सदिच्छा भेट देऊन बुंदेला ॲड्सचे संचालक विजय कुमार बुंदेला यांना शुभेच्छा दिल्या या उद्‌घाटना प्रसंगी अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली त्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी मंगेशजी वरकड, माजी आमदार कीर्ती बाबू गांधी, लोकमत कार्यालय प्रमुख किशोर बाबू दर्डा, जिल्हापरीषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मागुळकर, चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश चोपडा, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, मुंबई कृषी उत्पन बाजार समीती चे सभापती प्रविण देशमुख,नायब निवासी तहसीलदार संजय गोरलेवार, माजी नगर सेवक दत्ताभाऊ कुळकर्णी, अमोल देशमुख, कमल मिश्रा, दिपक ठाकुर ,डॉ.दिपक शिर‌भात,विवेक अरगुलवार,राजू मामीडवार,किशोर पुणवंतवार,निलेश ताटीपामुलवार,श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत,भास्कर मेहरे, विरेंद्र चौबे मनोज जैस्वाल अशोक गोडांबे नितीन भुसरेड्डी,सतीश बाळबुधे, अरविंद वानखेडे,सचिन झिटे, श्याम अरगुलवार, मतीन सैय्यद, सुधीर कैपील्यवार,अशोक चौधरी, डॉ.किशोर सोनटक्के, शैलेश करीहार शहर कांग्रेस कमेटी चे ओम तिवारी, बंटी त्रिवेदी, राजु जेकब, आर्किटेक डि. के.अग्रवाल,नरेंद्र कोठारी अँड महेंद्र ओसवाल चार्टड अकाउंट अमित अग्रवाल, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष विजय लाहोटी निर्माता दिग्दर्शक- दिगंबर सातपुते अभिनेत्री -अस्मिता वानखेडे बाल कलाकार -उर्वि काळे,दिप गुल्हाणे मेकअप आर्टिस्ट प्रांजली गुल्हाणे मानवाधिकार संघटन राज्य उपाध्यक्ष सौ. सरला इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष पुजा वानखेडे नितु गटलेवार, रेखा जगताप, प्रतिभा फाउँडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली देशमुख, संगीता पिपराणी, प्रा. सुधा खोडके , सौ चेतना ठाकरे मेडम.किशोर बोरा, आशिष बोरा , चेतन दर्डा, विपुल धोराजीवाला, अभिषेक पोकर्णा ,योगेश पटेल जस्मीत नन्नरे , नंद कुमार बोरा कविता कोठारी, तेजस कोठारी सहा जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधवांनी. मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन नविन कार्यालयास शुभेच्छा दिल्या.आभार योजित बुंदेला यांनी मानले.

Copyright ©